‘जे सोडून गेले त्यांच्या..’; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नऊ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली, यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कासदार शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे.

‘जे गेले आहेत त्यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दरवाजे बंद झालेत, असं मोठं वक्तव्य पवार यांनी केलं आहे. हे वक्तव्य राष्ट्रवादीतून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या नेत्यांसाठी असल्याची चर्चा सुरू आहे, यामुळे आता राजकीय वर्तुळातही उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीचे सर्व आमदार, खासदार आणि जिल्हाध्यक्षांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला खासदार शरद पवार यांनी संबोधित केले. महाविकास आघाडीमध्ये ज्या काही आपल्या वाटेला ७०-८० येतील त्याच्या तयारीला लागण्याचे आवाहन देखील पवार यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.