पोळ्याच्या दिवशी मारहाणीतील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू… तिन आरोपी अटकेत…

0

 

वरखेडी, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

येथे बैल पोळ्याच्या दिवशी संतोष दगडू भोई (७३) हे रात्री आठ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोर (बाज) खाट टाकून झोपलेले असतांना, रविंद्र सखाराम भोई हे त्यांचा बैल पळवत घेऊन जात होते, यावेळी  बैलाचा धक्का संतोष भोई याच्या खाटेला लागला. अचानक धक्का लागल्याने संतोष भोई हे ओरडून उठले, त्यांच्या ओरडण्याचा रविंद्र भोई यांना राग आल्याने रविंद्र सखाराम भोई यांनी प्रकाश भोई, धना भोई यांना बोलावून घेऊन सर्वांनी मिळून संतोष दगडू भोई यांच्याशी वाद घालून, त्यांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली होती. या मारहाणीत संतोष भोई यांच्या पाठीवर, हातावर व डोक्याला जबर दुखापत झाली, त्यामुळे त्यांना तातडीने पाचोरा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी संतोष भोई यांनी पाचोरा येथे दिलेल्या जबाबावरुन पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर २५५/२०२३ भादवी कलम ३२३, ३४ अन्वये दिनांक १७ सप्टेंबर २०२३ रविवार रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मात्र रुग्णालयात संतोष भोई यांच्यावर उपचार सुरु असतांनाच दि १८ सप्टेंबर २०२३ सोमवार रोजी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत पाचोरा ग्रामीण रुग्णालयाकडून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला माहिती प्राप्त होताच या मारहाणीच्या गुन्ह्यात भादवी कलम ३०२ हे वाढीव कलम लावण्यात आल्याने सदर हाणामारी प्रकरणातील गुन्ह्यात रवींद्र सखाराम भोई, प्रकाश दशरथ भोई, धनराज उर्फ (धना) प्रकाश भोई अशांना अटक करण्यात आली असून, सदर गुन्ह्याचा तपास पिंपळगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे व त्यांचे सहकारी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.