वरणगांवकर विद्यालय पाण्याच्या टाकीजवळ आहे खरे, पण कोणत्या?

0

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

घाटपुरी येथील किसन नगर भागातील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या ग्रामपंचायतच्या ओपन स्पेसवर सरलाताई वरणगावकर विद्यालयाने अतिक्रमण केल्याची बाब स्पष्ट होत आहे. मात्र या प्रकरणी महसूल प्रशासन व घाटपुरी ग्राम पंचायतने काय कारवाई केली हे समजू शकले नाही. परंतु या अनुषंगाने महसूल व शिक्षण विभागाचा वरदहस्त असलेल्या सरलाताई वरणगावकर विद्यालयाच्या अफलातून प्रकाराचे एक-एक किस्से समोर येत आहेत. हे किती खरे खोटे हे चौकशी केल्यानंतर समोर येईलच.

सरलाताई वरणगावकर विद्यालयाचे पुर्वीचे नाव साबणे हायस्कूल असे होते. सदर हायस्कूल हे खामगांव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या घाटपुरी पाण्याच्या टाकीजवळ होते. वरणगांवकर विद्यालय नामांतर झाल्यानंतर किसननगर भागातील पाण्याच्या टाकीजवळ स्थलांतरीत झाले. या दोन्ही टाक्या घाटपुरी ग्रा. पं. च्या हद्दीत आहेत. तर वरणगावकर विद्यालयाला शिक्षण विभागाचे स्थानांतरण पत्र प्राप्त झाले नसल्यामुळे शिक्षण विभागाच्या दप्तरी वरणगावकर विद्यालयाचा पाण्याच्या टाकीजवळ असा जुनाच पत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे हे आणखी नवीन काय गौडबंगाल आहे हे चौकशी अंतीच कळेलच. तसेच शाळेच्या एकुण क्षेत्रफळाच्याही बऱ्याच भानगडी असल्याचे समजते.

Leave A Reply

Your email address will not be published.