भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

पिंपरी चिंचवड विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले आहे. लक्ष्मण जगताप यांना कर्करोग झाला होता. त्यांच्यावर मागील दिवसांपासून पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिट्लमध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

भाजप आमदार लक्ष्मण जगताप हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांची प्रकृती ही अत्यंत नाजूक होती. त्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं. पण उपचारादरम्यान आज त्यांचं निधन झालं. आज दुपारी 2 ते 6 या दरम्यन त्यांचं पार्थिव अंत्य दर्शनासाठी त्यांच्या घरी ठेवण्यात येणार आहे. संध्याकाळी 7 वाजता पिंपरी गुरव इथं अंत्यविधी होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.