Friday, December 9, 2022

मित्रानेच केला मित्राचा घात ! विहिरीत ढकलून केली हत्या

- Advertisement -

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

भुसावळ तालुक्यातील जाडगाव येथील दिवसभर सोबत राहणारे दोघे मित्र दारू पिऊन विहीरीच्या काठावर बसून गप्पा मारताना त्यांच्यात शाब्दिक खटका उडाला आणि एकाने दुसऱ्याला चापटा बुक्के पाठीत मारून विहिरीत ढकलून दिल्याने एकाचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याची घटना उघडकीस आली असून संशयितास अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

तालुक्यातील जाडगाव येथे दि. ८ सोमवार रोजी गावातील पंचायती विहिरात पडून मृत्यू झाल्याची घटना घडल्याने सुरुवातीस पोलीस स्टेशनला आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती.  मात्र पो. हे. कॉ. मधुकर भालशंकर व कॉ. योगेश पाटील हे तपास करीत असताना वेगळीच माहीती समोर आली आहे.

- Advertisement -

गावातील गोंविदा संतोष पाटील (वय ३५) व राजु युवराज सोनवणे (वय ३२) हे दोघे मित्र कित्येक दिवसांपासून सोबत राहून काम करीत असायचे. दि. ८ सोमवार रोजी दुपारच्या वेळेस दोघांनी सोबत दारू पिऊन गावातील पंचायती विहिरीच्या काठावर बसून गप्पा मारत बसले. त्यात दोघांमध्ये शाब्दिक खटके उडाले व गोविंदाला राजूने चपाटा बुक्याने मारून विहिरीत लोटून दिल्याने गोविंदाचा पाण्यात पडून अंत झाला होता. याबाबत सुरुवातीस वरणगाव पोलीस स्टेशला संतोष जगदेव पाटील यांच्या खबरी वरून अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र पोलीसांना या घटनेची शंका असल्याने या घटनेचा बारकाईने तपास करून उलगडा सोडविला.

याबाबत मयताचे वडील संतोष पाटील यांच्या फिर्यादीनुसार राजु सोनवणे यास अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात भा. द. वी. कलम ३०४, ३२३ सदोषमनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून  घटनेचा पुढील तपास सह पोलीस निरिक्षक आशिष आडसुड करीत आहेत.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या