नांद्रासह परिसरात गारांसह जोरदार पाऊस… पिकांचे नुकसान….

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

तालुक्यातील नांद्रा, कुरंगी, माहेजी, वरसाडे, डोकलखेडा, दहिगांवसह परिसरात आज २९ एप्रिल रोजी सायंकाळी ४:३० वाजता अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसासह गारा ही कोसळु लागल्याने परिसरातील गुरांच्या चाऱ्यासह मका, बाजरी व सुर्यफुल या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तसेच गारांमुळे परिसरातील मोटरसायकल यांचे देखील किरकोळ नुकसान झाले असून सुमारे १० ते १५ मिनिटे चाललेल्या या पाऊस व गारांमुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत होवुन शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती. माहेजी येथे झाडाची फांदी तुटुन विजेच्या तारांवर पडल्याने परिसरातील विज पुरवठा काही काळ बंद होता. पाचोरा शहरात २९ एप्रिल रोजी आठवडे बाजार असल्याने मोठ्या प्रमाणात बाजारात गर्दी होती. सायंकाळी ४:३५ ते ४:५५ दरम्यान अचानक पावसाला सुरुवात झाली. २० मिनिटे जोरदार पाऊस झाल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.

Leave A Reply

Your email address will not be published.