Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शनिपेठ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांच्या बदलीने प्रश्न सुटेल का?
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»डोक्यात दांडा मारून एकाचा खून, आरोपी अटकेत
    गुन्हे वार्ता

    डोक्यात दांडा मारून एकाचा खून, आरोपी अटकेत

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 15, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    दर्यापूर शिवारातील गणेशनगरमधील एका वडापावच्या दुकानावर किरकोळ कारणावरून आयुध निर्माणीच्या कर्मचार्‍याने जि. प. पाणी पुरवठा कर्माचाऱ्याच्या डोक्यात, मानेवर लाकडी दांडयाने मारहाण करून खुन केल्याची घटना दि. १४ रविवार रोजी सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास घडली.

    वरणगाव शहरातील शिवाजीनगरमधील रहिवाशी प्रमोद ज्ञानेश्वर महाराज (वय ५५) हे रविवारच्या सकाळी दर्यापुर शिवारातील गणेशनगरमधील एका वडापावच्या दुकानासमोर खुर्च्या अस्ताव्यस्त करीत होते, त्यावेळी दिपक कृष्णाकुमार सिंग तेथे येऊन खुर्च्या का फेकत आहे असा जाब विचारताच त्या दोघात शाब्दिक बाचाबाची झाली.

    यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्यांनी त्यांच्यात मध्यस्थी करून भांडण मिटवित तेथुन निघुन गेले. मात्र थोड्याच वेळाने दिपक सिंग घरी जाऊन लाकडी दांडा घेऊन आला व पुन्हा प्रमोद महाजन त्याच वडापावच्या दुकानात वडापाव खात असताना पाठी मागुन येऊन दिपक याने हातातील लाकडी दांड्याने प्रमोदला डोकावर, मानेवर  व पाठीवर जबर बेशुद्ध होईपर्यत मारहाण करून तेथुन निघुन गेला. तर प्रमोद खुर्चीतच बेशुद्ध अवस्थेत असतना मनोहर ओंकार महाजन  (प्रमोदचे चुलत भाऊ) हे घटना स्थाळावर आले व प्रमोदला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरानी त्यांना तपासाअंती मृत घोषीत केले.

    मारहाण केल्यानतंर दिपक सिंग हा घटनास्थळावरून पसार झाला होता. मात्र या घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलीस स्टेशनचे सह पोलीस निरिक्षक आशिष आडसुळ, उप निरिक्षक परशुराम दळवी, उप निरिक्षक इस्माईल शेख, पो. हे. कॉ. नागेंद्र तायडे,  कॉ. विजय बाविस्कर, कॉ. योगेश पाटील यांनी घटना स्थळाकडे धाव घेऊन पसार झालेला दिपक याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.

    याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला मनोहर ओंकार महाजन यांच्या फिर्यादीवरून आयुध निर्माणी कर्मचारी दिपक कृष्णा कुमार सिंग यांच्या विरोधात भा द वी कलम ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिक्षक राजकुमार शिंदे यांच्या मार्गर्शनाखाली सह पो निरिक्षक आशिष आडसुळ हे करीत आहे.

    #crime #murder Varangaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार

    April 17, 2026

    बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!

    April 17, 2026

    किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.