वरणगाव आयुध निर्मार्णीतील स्टेट बँकेत चोरीचा प्रयत्न

0

 

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

वरणगाव येथील आयुध निर्मार्णीतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत भिंतीला भगदाड पाडून चोरी करण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्याने केल्याची घटना दि २३ मे रोजी मध्यरात्री घडली. सदर प्रकरण दि २४ मे बुधवारी सकाळी उघडकीस आले असून चोरी करणाऱ्या चोरट्याचे छायाचित्रे सि सि टीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहेत.

याबाबत सविस्तर वृत असे कि, आयुध निर्माणी वसाहत मधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत मंगळवार दि २३ च्या मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने बॅकेच्या इमारतीच्या मागच्या बाजूला भिंतीला भगदाड पाडून आत प्रवेश करून दरोड्य सारखा प्रयत्न केला. ही घटना दि २४ बुधवार रोजी सकाळी बॅक कर्मचारी कामावर आल्या नंतर उघडकीस आली.

दरम्यान याप्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनला घटनेची माहीती बँक व्यवस्थापक मनिष शर्मा यांनी दिली. त्यानंतर सपोनि आशिष आडसुड, उप.निरिक्षक परशुराम दळवी,   नागेंद्र तायडे, विजय बाविस्कर, प्रमोद कणखरे यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. यादरम्यान एका व्यक्तीचे बँकेच्या सि सि टीव्ही कॅमेर्‍यात त्याचे चित्रकरण कैद झाले असल्याचे त्यांना समजले. या बाबत वरणगाव पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास श्रेणी उप निरिक्षक इस्माईल शेख हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.