हा व्यक्ती दारूच्या बाटलीने झाला मालामाल…

0

 

व्हायरल, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, एक व्यक्ती अनेक वर्षे जुन्या दारूच्या बाटलीमुळे आता करोडपती बनली आहे. या व्यक्तीकडे दारूची भरलेली एक जुनी बाटली होती, पण लिलावात जेव्हा ही बाटली काढण्यात आली तेव्हा तिची किंमत एवढी वाढली की तुम्ही विचार करून थक्क व्हाल. वाईन जितकी वर्षे जुनी तितकी ती महाग आणि चविष्ट असते असे आपण अनेकदा ऐकले असेल. खूप वर्षे जुन्या दारूचा रंग आणि नशा खास असते. त्यामुळे अनेकदा मद्यप्रेमी जुनी दारू मागताना दिसतात. त्यामुळे तिची किंमतही जास्त असते.

बोनहॅम स्किनर या लिलावगृहानुसार, मार्चमध्ये या व्यक्तीने सांगितले होते की, त्याच्याकडे एक ५० वर्षे जुनी दारूची बाटली आहे, जिला त्याने कधी स्पर्शही केलेला नाही. या वेळी आम्ही ती बाटली लिलावात ठेवण्याचा निर्णय घेतला. ही बाटली तेव्हा ५०-८० हजार डॉलर्सदरम्यान विकली जाईल अशी अपेक्षा होती. परंतु ती आता १०६,२५० डॉलर्समध्ये विकली गेली आहे. त्यांच्या मते, ही एक अत्यंत दुर्मिळ वाइन असून जिची किंमत त्या काळी खूपच कमी होती.

‘द वॉशिंग्टन पोस्ट’च्या वृत्तानुसार, कॅलिफोर्नियातील मार्क पॉलसन नावाच्या एका व्यक्तीने १९७० च्या दशकात Domaine de la Romanée-Conti La Tache नावाची एक दारूची बाटली विकत घेतली होती, जी अनेक वर्षे त्यांच्या तळघरात कार्डबोर्ड बॉक्समध्ये लपवून ठेवली होती. त्या वेळी पॉलसन यांनी ती बाटली २५० डॉलर्स म्हणजेच आजच्या सुमारे २० हजार रुपयांना विकत घेतली होती. त्यानुसार आता तिची किंमत १,८८९ डॉलर एवढी असती. पण खूप वर्षे जुनी असल्याने ही बाटली आता लिलावात १०६,२५० डॉलरपेक्षा जास्त किमतीला विकली गेली आहे. म्हणजेच या व्यक्तीला केवळ एका दारूच्या बाटलीसाठी जवळपास ८७,८३,८४६ रुपये मिळाले आहेत.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.