ब्रेकिंग : अवैध वाळू आणि वाहतूक रोखण्यासाठी गस्ती घालणाऱ्या पथकाचा माफियांकडून पाठलाग ; चित्रफीत आली समोर

0

जळगाव ;- देशाच्या नैसर्गिक संपत्तीचे, बेकायदेशीर उत्खननासाठी आणि अवैध वाहतूक रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियमित गस्त घातली जाते.मात्र ज्या नदीपात्रातून ज्या रस्त्यांवर अवैधरित्या वाळू ,गौण खनिजाची वाहतूक होत असते त्या रस्त्यावर महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी हे नियामित गस्त घालीत असताना आज सकाळी एका गस्ती पथकाचा सुमारे १५ ते २० दुचाकींवरून अवैधरित्या वाळूमाफियांचे तथाकथित हस्तकांकडून पाठलाग होत असल्याचा व्हिडीओ समोर आला असून उपजिल्हाधिकाऱयांवर  जीवघेणा हल्ला झाल्याची घटना ताजी असताना तरी देखील वाळू माफियांची मुजोरी यामुळे वाढली असल्याचे चित्र या चित्रफितीतून समोर आले असले तरी महसूल अधिकारी कर्मचारी जीवावर उदार होऊन आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. त्यांना एका प्रकारे घाबरविण्याचा हेतुपुरस्सर प्रकार होत असल्याने महसूल विभागाच्या कर्मचाऱयांनी त्यांना भीक घातली नाही याचे निश्चित कौतुक आहे.

महसूल विभागाची एका वाहनाद्वारे  रस्त्यावर गस्त सुरु असताना आज सकाळी एक प्रसंग घडला.. त्याची चित्रफीत अधिकाऱ्यांनी शासकीय कर्तव्यावर असताना बनविली आहे. एवढ्या सकाळी या शासकीय वाहनासोबत इतक्या मोटारसायकली प्रवास करत होत्या . मात्र हा अधिकार्याना एक प्रकारे धमकाविण्याचा घाबरविण्याचा प्रकार असल्याचे या व्हिडिओमधून दिसून येत आहे . त्यांनी पाठलाग करून इतक्या दुचाकींद्वारे करून मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे यातून दिसून येत आहे.

अशा प्रकारच्या गस्ती मध्ये अधिकारी, कर्मचारी आपला जीव धोक्यात घालतात. या बदल्यात खोट्या तक्रारी दाखल केल्या जाणे आणि सोशल मीडिया ट्रोलिंगच्या स्वरूपात मानसिक छळाचा सामना त्यांना करावा लागतो. जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी असे हल्ले, धमक्या आणि धमकावूनही आपले कर्तव्य बजावत राहतील. असल्या दबावाला बळी पडणार नाहीत.. ते नियमित आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावत राहतील यात शंका नाही .

 

Leave A Reply

Your email address will not be published.