मोठी बातमी; शरद पवार गट होणार काँग्रेसमध्ये विलीन !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची माहिती खात्रीशीर असल्याची सूत्रांनी दिली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पक्षातील सर्व आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली आहे. राज्यात सध्या ज्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बेंथॅम बोलावली आहे. बैठकीत राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकीवर चर्चा सुरु आहे. या शिवाय पवार गट काँग्रेस पक्षात विलीन करण्याबाबत चर्चा सुरू आहे. अशी माहिती समोर आली आहे.

शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार

शरद पवार गट काँग्रेस पक्षात विलीन होणार असल्याची बातमी समोर आली आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार गटाकडून मात्र या बातमीला दुजोरा देण्यात आला आहे. शरद पवार गटाचे नेते मंगलदास बांदल यांनी यावर वक्तव्य केलं आहे. शरद पवार आजच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. पक्षाला विलीन करण्याचा निर्णय हा राष्ट्रीय पातळीवरचा आहे. वरिष्ठ नेते याबाबतचा निर्णय घेतील. मात्र अशी चर्चा पवारांनी बोलावलेल्या बेठकीत सुरु आहे, असं मंगलदास बांदल म्हणाले.

पवार गटाची पुण्यात बैठक
लोकसभा निवडणुकीसंदर्भात शरद पवारांनी पक्षाची पुण्यात महत्वाची बैठक बोलावली आहे. शरद पवार लोकसभा मतदारसंघनिहाय बैठक घेत आहे. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, रोहित पवार, अमोल कोल्हे, अनिल देखमुख, श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील उपस्थित आहेत. पुण्यातील मोदी बागेत शरद पवारांच्या कार्यालयात बैठक सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.