गुजरातमधील वलसाडमध्ये हमसफर एक्सप्रेसला आग, घटनास्थळी गोंधळ…

0

 

वलसाड, लोकशाही न्यूज नेटवर्क :

 

गुजरातमधील वलसाडमध्ये एका एक्सप्रेस ट्रेनला आग लागली. तिरुचिरापल्ली ते श्री गंगानगर दरम्यान धावणारी हमसफर एक्सप्रेस छिपवाडजवळ पोहोचली होती. दरम्यान, ट्रेनच्या जनरेटर डब्याला आग लागली. ट्रेनला आग लागताच घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. जनरेटरच्या डब्याला आग प्रवाशांच्या डब्यातही लागल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर आग लागलेले डबे ट्रेनपासून वेगळे करण्यात आले. मात्र, आगीमुळे जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

या घटनेनंतर पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ सुमित ठाकूर यांनी सांगितले की, वलसाडमधून जात असताना तिरुचिरापल्ली जंक्शन ते श्री गंगानगर जंक्शनकडे जाणाऱ्या ट्रेन क्रमांक 22498 च्या पॉवर कार/ब्रेक व्हॅन कोचमध्ये आग आणि धूर दिसला. शेजारील डब्यातील सर्व प्रवासी सुखरूप उतरले. कोणतीही जीवितहानी झाली नाही. या ट्रेनमधून डबा वेगळा केल्यानंतर तो लवकरच रवाना करण्यात येणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.