जळगाव जिल्हा सहकारी बोर्डची वार्षिक साधारण सभा उत्साहात संपन्न

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव जिल्हा सहकार बोर्ड जळगाव. या संस्थेची सभा जिल्हा सहकार बोर्डचे अध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेनंतर सहकारी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यकर्त्या मेळाव्याचे उदघाटन माजी पनन संचालक तसेच अप्पर आयुक्त सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे सुनील पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी सहकारी कार्यकर्ता कसा असावा? त्यांच्या अंगी कोणते गुण असावे? व भविष्यात सहकारी कार्यकर्त्याने उज्वल भविष्याकडे वाटचाल करून काम करावे. जिल्ह्यातील जुन्या सहकारी यांच्या कामाच्या पद्धती व नवीन सहकारी कायद्याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. व त्यांच्या शुभहस्ते जळगाव जिल्ह्यातील सहकारी संस्था व व्यक्ती यांना सहकारी गौरव पुरस्कार देण्यात आला.

पहिला व दुसरा पुरस्कार श्रीमती विजयाबाई शहाजीराव साळुंखे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रा. डी.पी. पवार यांच्या मार्फत देण्यात आला. त्यानंतर कै. मा.खा. भाऊसाहेब के. एम पाटील व सहकारमहर्षी कै. अण्णासो बापूराव देखमुख या दोघांच्या नावाने सुद्धा पुरस्कार देण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव व जळगाव जिल्हा सहकार बोर्डचे संचालक प्रमोद पाटील, डॉ. वसंत देशमुख, नाना पाटील, प्रवीणभाई गुजराथी, शिवाजी ढोले, किरण साळुंखे, भगतसिंग पाटील, अनिल शिसोदे अनंत देखमुख व सहसंचालक मंडळ व कर्मचारी उपस्थित होते.

पहिला पुरस्कार वनिता महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था चहार्डी ता.चोपडा, जय अंबे महिला सहकारी दूध उद्पादक संस्था शेलवड ता. बोदवड, वाघळी विविध कार्यकारी सेवासहकारी सोसायटी ता. चाळीसगाव, व देवीदास शिवराम मराठे यांना देण्यात आला. या कार्यक्रमाचे वाचन सहकार बोर्डेचे उपाध्यक्ष सतीश बापू शिंदे यांनी केले. व सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले. आभारप्रदर्शन जिल्हा सहकारबोर्डाचे मानद सचिव सुदाम पाटील यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.