जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
शहरातील प्रिपरेला हुडको परिसरात राहणाऱ्या एका २० वर्षीय महिलेचा अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शुक्रवारी २२ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, जळगाव शहरातील प्रिंप्राळा हुडको परिसरात २७ वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्यास होती. शुक्रवार दि. २२ सप्टेंबर रोजी दुपारी वाजेच्या सुमारास त्याच परिसरात राहणार इरफान आयुब सय्यद, शाहरुख आयुब सय्यद, आणि समा अयुब सय्यद या चौघांनी अश्लील हातवारे करून तिचा विनयभंग केला यानंतर पीडित महिलेले तिच्या पाटील घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला, त्यानुसार त्यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार रात्री ८.३० वाजता संस्थेत आरोपी इरफान सय्यद, शाहरुख आयुब सय्यद, फारख आयुब सय्यद, आणि समा अयुब सय्यद या चौघांवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहे