खळबळजनक : वडली येथे आई वडिलांसह मुलाचे विषप्राशन ! ; वडिलांचा मृत्यू

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

एकाच कुटुंबातील आई वडिलांसह मुलाने विषप्राशन (poisoning) केल्याची धक्कदायक घटना आज सकाळीजळगाव तालुक्यातील वडली (vadli ) येथे आज गुरुवार ६ रोजी उघडकीस आली असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. यातील वडिलांचा मृत्यू झाला असून आई आणि मुलगा या दोघांची प्रकृती अत्यवस्थ असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान तिघांनी असे टोकाचे पाऊल का उचलले याची माहिती समोर आली नाही.

नारायण दंगल पाटील (वय-६६) हे आपल्या पत्नी भारती पाटील (वय-५५) आणि मुलगा गणेश पाटील (वय-३३) वडली गावातील रहिवाशी असून त्यांच्या घरात गेल्या अनेक दिवसांपासून तणावाची परिस्थिती असल्याने त्यांनी आज सकाळी विषप्राशन केले . यानंतर त्यांना अत्यवस्थ जाणवू लागल्याने
गणेश पाटील याने आपला मित्र श्याम याला कॉल करून घरी येणयाचे सांगितल्यावरून श्याम हा घरी आला असता तिघे एकमेकांच्या गळ्यात हात टाकून असल्याचे चित्र दिसून आले. श्याम याने त्वरित ग्रामस्थांच्या मदतीने वाहनातून तिघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता नारायण पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर गणेश आणि त्याची आई भारती यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. याबाबत एमआयडीसी पोलिसांत नोंद करण्याचे काम सुरु होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.