मेगा रिचार्ज योजनेबाबत रक्षा खडसेंची मागणी

0

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

मेगा रिचार्ज योजनेचा तपशीलवार आढावा घेण्यासाठी आणि महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश यांच्यातील पाणी वाटप अंतिम करण्यासाठी दोन्ही राज्यांची संयुक्त बैठक घेण्यात यावी, खासदार रक्षा खडसे (MP Raksha Khadse) यांची केंद्रीय जलशक्ती मंत्री.गजेंद्रसिंह शेखावत (Gajendra Singh Shekhawat) यांना मागणी महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्यांचा महत्त्वाकांक्षी आंतरराज्य मेगा रिचार्ज प्रकल्प योजनेचा दोन्ही राज्यांद्वारे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झालेला असून, मेगा रिचार्ज योजनेचा तपशीलवार आढावा घेण्यासाठी आणि महाराष्ट्र व मध्यप्रदेश यांच्यातील पाणी वाटप अंतिम करण्यासाठी दोन्ही राज्यांची संयुक्त बैठक घेण्यात यावी अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन केली.

मेगा रिचार्ज महापुनर्भरण योजना हा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यांमधील महत्त्वाकांक्षी आंतरराज्य प्रकल्प आहे. मुळात, या प्रकल्पाची संकल्पना झोनमधील सातपुडा टेकड्यांच्या पायथ्याशी असलेल्या बाझाडा झोनमध्ये तापी नदीचे पुराचे पाणी झिरपून / घुसखोरी करून त्या भागातील अत्यंत खालावलेली भूजल पातळी वाढवणे आणि विद्यमान सिंचन स्थिर करणे ही आहे. या प्रकल्पाचा महाराष्ट्रातील जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यातील सुमारे १३३७०६ हेक्टर क्षेत्राला तर मध्यप्रदेश राज्यातील सुमारे ९६०८२ हेक्टर क्षेत्राला फायदा होईल. या भागातील भूजल पातळी कमी होण्याचे प्रमाण प्रति वर्ष सुमारे १ मीटर असल्याने केंद्रीय भूजल मंडळाने (CGWB) तापीच्या पुराच्या पाण्याने क्षेत्र पुनर्भरण करण्याची सूचना केली आहे. त्यानंतर भारत सरकार जलशक्ती मंत्रालयद्वारे टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली. टास्क फोर्सने योजनेचा व्यवहार्यता अहवाल तयार करून सरकारला सादर केला आहे.

योजनेचा तपशीलवार प्रकल्प तयार करण्यासाठी महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्य सरकारने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून तो राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे मंजुरीसाठी सादर केलेला असल्याने, सदर प्रकल्प हा आंतरराज्यीय प्रकल्प असल्याने, केंद्रीय स्तरावरून योजनेचा तपशीलवार आढावा घेण्यासाठी तसेच महाराष्ट्र राज्य व मध्यप्रदेश राज्य यांच्यातील पाणी वाटप अंतिम करण्यासाठी दोन्ही राज्याचे प्रमुख पदाधिकारी व अधिकाऱ्यांची दिल्ली येथे संयुक्त बैठक घेण्यात यावी अशी मागणी यावेळी खासदार रक्षा खडसे यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे केली.

Leave A Reply

Your email address will not be published.