महिला दिनानिमित्त व.वा वाचनालयातर्फे रविवारी “त्या तिघी” नाटकाचे आयोजन…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

जागतिक महिला दिनानिमित्त व.वा वाचनालय आणि जळगाव जनता सहकारी बँक लि. यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. शोभा साठे लिखित त्या तिघी या कादंबरीवर आधारित अभिव्यक्त पुणे प्रस्तुत “त्या तिघी” हा एकपात्री नाट्यप्रयोग दि. १० मार्च २०२४, रविवार रोजी सायंकाळी ७ वाजता गंधे सभागृहात जळगावकर रसिकांसाठी विनामूल्य आयोजित केला आहे.

आपल्या पतीच्या राष्ट्र कार्याची धुरा निष्ठेने सांभाळणाऱ्या सावरकर घराण्यातील वीरांगनांची ही अनोखी शौर्यगाथा असून या प्रयोगाची संकल्पना, संहिता लेखन, नेपथ्य, वेशभूषा, दिग्दर्शन व सादरीकरण अपर्णा चोथे यांचे असून अजित यशवंत यांचे संगीत तर प्रकाशयोजना संकेत पारखे यांची आहे.

वाचनालयात बाल व युवा विभाग लवकरच सुरू होणार…

वाचन समृद्धीचा राजमार्ग हे ब्रीद वाक्य लक्षात घेऊन बाल व युवा वाचकांसाठी समृद्ध व संगणकीय कृत सुविधांसह अद्ययावत बाल व युवा विभाग लवकरच सुरू करण्याचा वाचनालयाचा प्रयत्न असून त्याचे काम वेगाने सुरू आहे. या विभागात विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार आवश्यक ते वाचन साहित्य पुस्तकांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याबरोबरच इंटरनेट सुविधेद्वारे जागतिक स्तरावरील चांगल्या ग्रंथालयांशी जोडून त्यावरील साहित्य उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या नव्या विभागात विद्यार्थ्यांना ज्ञानवर्धक व रंजक असे चांगले सिनेमे व लघु चित्रपट दाखवता येतील अशी व्यवस्था सुद्धा असणार आहे.

यानिमित्ताने बाल व युवा वाचकांना ग्रंथालयाकडे व वाचनाकडे आकर्षित होण्यासाठी विविध शाळांना ग्रंथालयासाठी नियमित तासिका असाव्यात व त्यात विद्यार्थ्यांनी वाचनालयात यावे असा आमचा प्रयत्न आहे. शालेय खास करून १४ वर्षा खालील विद्यार्थ्यांसाठी मोफत वाचनालय योजना सुरू आहेच. उन्हाळ्याच्या सुट्टीत व नेहमी सुद्धा मुलांनी त्याचा लाभ घ्यावा.

Leave A Reply

Your email address will not be published.