अवकाळी पावसाचा इशारा, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बदल होताना दिसत आहे. कधी थंडी तर कधी उन्हाचा तडाखा त्यातच आता पुणे हवामान विभागाने  अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. पुढील दोन दिवस हा पाऊस असणार आहे. यात जळगाव जिल्ह्यात देखील तुरळक पावसाचे संकेत हवामान खात्याकडून वर्तविण्यात आले आहे.

हवामान खात्याचा अंदाज 

हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत पुढील दोन दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच राज्यातील उर्वरित भागात हवामान ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर तमिळनाडूवर वाऱ्याची चक्रीय परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती आता दक्षिण – पूर्व अरबी समुद्र आणि लगतच्या केरळ किनारपट्टीलगत आहे. आठ नोव्हेंबर रोजी त्याचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम म्हणून दक्षिण कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढून मेघर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्याचवेळी राज्यातील अन्य भागात हवामान अशंत: ढगाळ राहण्याचा अंदाज आहे.

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान 

जळगाव जिल्ह्यात देखील तुरळक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. १० ते १३ नोव्हेंबर दरम्यान जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.