एका मस्तवाल गद्दार खासदाराने डीनला संडास साफ करायला लावले – उद्धव ठाकरे

0

मुंबई ;- नांदेडसह राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आज पाटकर परिषदेत सडकून टीका करीत एका मस्तवाल गद्दार खासदाराने डीनला संडास साफ करायला लावले याबाबत रोष व्यक्त केला. शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी नांदेडच्या रुग्णालयाला भेट दिली. यावेळी रुग्णालयातील अस्वच्छता पाहून संतापलेल्या हेमंत पाटलांनी थेट रुग्णालयाच्या डीनलाच स्वच्छतागृह साफ करायला लावले. हे प्रकरण हेमंत पाटलांना भोवले असून त्यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यावर नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीन डॉ. एस. आर. वाकोडे यांनी तक्रार दाखल केली.

उद्धव ठाकरे म्हणाले कि , एका मस्तवाल गद्दार खासदाराने डीनला संडास साफ करायला लावले. ते डीन आदिवासी आहेत असं ते म्हणतात. मी कधीच जातपात पाहिली नाही. मी सर्वांना एकाच न्यायाने वागवलं आहे. मात्र, डीनला संडास साफ करायला लावल्यानंतर त्या गद्दारावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला म्हणून डीनला धमकावण्यासाठी त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“राज्यभर औषधांचा तुटवडा आहे. मंत्री म्हणतात औषधे मुबलक आहेत, पण प्रत्यक्षात खडखडाट आहे. या बातम्या माध्यमांनीच दिल्या आहेत. मग हे मंत्री नेमके कोण आहेत. आरोग्य खातं विभागलं गेलं आहे. मात्र, औषधं मुबलक प्रमाणात आहेत असा दावा करणारे मंत्री कोणीही असले, तरी चंद्रपूरची एक महिला सांगत आहे की, बाहेरून औषधं आणण्यासाठी आम्हाला लिहून दिलं जातं. मग पंतप्रधानांच्या योजना, महाराष्ट्र सरकारच्या योजना, मुख्यमंत्री सहायता निधी यातून या रुग्णांचा खर्च केला जाणार आहे का? असा सवाल उद्धव ठाकरें यांनी यावेळी विचारून मुख्यमंत्री सहायता निधीतील मदत नेमकी कुणाला जाते याची चौकशी झाली पाहिजे.अशी मागणी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.