महाराष्ट्र फुटबॉल संघटनेने एक जिल्हा एक मत ठराव सर्वानुमते केला मंजूर

0

जळगाव ;– वीफा अर्थातच वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन म्हणजे महाराष्ट्र राज्यात फुटबॉल चालवणारी एकमेव अधिकृत संघटनेच्या विशेष सर्वसाधारण सभेत संघटनेच्या घटनेत कलम १२ आणि १५ मध्ये बदल करण्यात आला व त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील संलग्न असलेल्या प्रत्येक जिल्ह्याला एक मताचा अधिकार देण्यात आला यापूर्वी राज्यातील काही जिल्ह्यांना तीन तर काही जिल्ह्यांना दोन मते देण्याचा अधिकार होता तो या ठरावामुळे सर्व जिल्ह्यांना एकसमान हक्क मिळालेला आहे.

विफा- महाराष्ट्र राज्य फुटबॉल संघटनेची विशेष व ७४ वी सर्व साधारण सभा अशा दोन वेगवेगळ्या सभा ४ ऑक्टोबर रोजी कूपरेज फुटबॉल ग्राउंड, मुंबई येथे झाली.अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे व भारतीय फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष खासदार प्रफुल पटेल होते. व्यासपीठावर वरिष्ठ उपाध्यक्ष हरेश वोरा, मालोजी राजे छत्रपती,डॉ विश्वजीत कदम, सचिव सॉटर वाज, खजिनदार प्यारेलाल चौधरी, सहसचिव सलीम परकोटे, डॉक्टर किरण चौगुले व सुशील सुर्वे यांच्यासह  सभेत संलग्न असलेल्या ३५ जिल्ह्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जळगाव जिल्ह्याच्या कार्याचे कौतुक वरिष्ठ उपाध्यक्ष हरेश वोरा यांनी राज्याच्या जिल्ह्यातील फुटबॉल संघटनेच्या प्रगती अहवाल सादर करताना संपूर्ण महाराष्ट्रात जळगाव जिल्हा फुटबॉल संघटना व खास करून सचिव फारुख शेख हे फुटबॉल खेळाच्या व खेळाडू च्या विकासासाठी प्रयत्नशील असून सप्टेंबर २३ मध्ये त्यांनी शालेय राज्यस्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा घेऊन एक वेगळा लौकिक मिळविला आहे. तसेच शालेय स्पर्धांमध्ये सुद्धा अपकमिंग खेळाडूंना प्रोत्साहित करणारा एकमेव जिल्हा असून तो खेळाडूंना विविध पारितोषिके देत आहे. अशा प्रकारे कार्य इतर जिल्ह्यांनी करावे असे आवाहन त्यांनी सभेत केले.

फुटबॉल विकास साठी आर्थिक मदत
जिल्हयात फुटबॉल वाढवण्या साठी विफा ५० हजार व डॉ विश्वजीत कदम ५० हजार अशी एक लाख रु ची मदत करणार असल्याचे अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी घोषित केले.

Leave A Reply

Your email address will not be published.