टोमॅटोला सुगीचे दिवस ; शेतकऱ्याला मिळाले दीड कोटींचे उत्पन्न

0

मुंबई ;- कधी कांदा,खाद्य तेल,डाळ ,कोथिंबीर,मिरची ,बटाटा ,लसूण आदींच्या भावांनी एकीकडे सर्वसामान्य व्यक्ती मेटाकुटीला आला असताना दीड महिन्यापूर्वी मातीमोल भावात विक्री करूनही ज्या टोमाटोला भाव मिळत नव्हता तो रस्त्यावर फेकून देण्याची पाळी शेतकऱ्यावर आली होती. तसेच त्याच्या उत्पन्नाचा आणि वाहतुकीचा खर्च निघत नसल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. आज त्याच टोमाटोला सुगीचे दिवस आले असून टोमाटोची लागवड करून लाखो रुपयांचा निव्वळ नफा कमावलयाची उदाहरणे समोर येत आहे. एका शेतकऱ्याने तर तब्बल दीड कोटींचा नफा मिळविल्याचे चर्चा सध्या जोरात सुरु आहे.

एकीकडे ग्राहकांची ही अवस्था असताना दुसरीकडे महाराष्ट्रात एका शेतकऱ्यानं टोमॅटोच्या विक्रीमुळे कोट्यवधींचा नफा कमावल्याचं समोर आलं आहे. यामुळे टोमॅटोच्या दरांमुळे सामान्यांना आर्थिक भार सोसावा लागत असला, तरी दुसरीकडे बळीराजाला मोठा आर्थिक दिलासा मिळत असल्याचीही भावना व्यक्त होत आहे.

दोनच दिवसांपूर्वी कर्नाटकच्या एका शेतकऱ्याला एका दिवसात ३८ लाखांचा नफा झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यापाठोपाठ महाराष्ट्राच्या जुन्नर भागातील एका शेतकऱ्यानं गेल्या महिन्याभरात फक्त टोमॅटोच्या विक्रीतून सुमारे दीड कोटींचा नफा कमावल्याचं समोर आलं आहे. इंडिया टुडेनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. जुन्नरमधील तुकाराम भागोजी गायकर या शेतकऱ्यानं त्याच्या १८ एकर जमिनीपैकी १२ एकरवर टोमॅटोची लागवड केली होती. गेल्या महिन्याभरात गायकर यांनी तब्बल १३ हजार टोमॅटो क्रेटची (२० किलो प्रतीक्रेट) विक्री केली असून त्यातून त्यांना दीड कोटींहून अधिक उत्पन्न मिळालं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.