वृक्षारोपणासाठी धानवड ग्रामस्थांचा पुढाकार अनुकरणीय – खा. उन्मेश पाटील

0

ग्रामस्थांनी 8 हजार वृक्ष लागवड करून उभारला जैव विविधता प्रकल्प

जळगाव ;- जिल्ह्यातील धानवड येथे ग्रामस्थांनी निसर्ग व पर्यावरण संवर्धनाचा ध्यास घेऊन शिवारात पाच एकर परिसरात लोकचळवळीतून जैवविविधता प्रकल्प उभारला असून या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी विद्यार्थी यांच्या श्रमदानातून 8 हजार पेक्षा जास्त वृक्षांची लागवड करण्यात आली असून फूल व देशी वृक्षांची लागवड करीत लागवड केलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्प करत जैवविविधता जोपासण्याचा ग्रामस्थांनी केलेला प्रयत्न हा समाजासाठी अनुकरणीय आहे असे गौरवोद्गार खा. उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केले आहे.

आज धानवड ता.जि.जळगाव येथे गावालगत गावकऱ्यांनी 8000 वृक्षरोपणाचा भव्य कार्यक्रम मेरिको कंपनी व निवास शाळेच्या सहकार्यातून आयोजित करण्यात आला होता.यावेळी व्यासपिठावर खासदार उन्मेशदादा पाटील, ज्ञानेश्र्वर महाराज जळकेकर, बाजार समितीचे माजी संचालक मनोहर पाटील,पंचायत समितीचे सदस्य ऍड.हर्षल चौधरी,धानवड सरपंच संभाजी पवार,उपसरपंच हरिलाल शिंदे, चिंचोली सरपंच शरद घुगे, सुनील लाड ,विकासो चेअरमन ब्रिजलाल पाटिल, व्हाईस चेअरमन श्रीराम पाटिल,शिवराज पाटील, भाऊसाहेब पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष समाधान पाटील, तालुका कृषी अधिकारी शिवाजी राऊत,परश्रुराम कुलकर्णी,सत्या नायडू जिल्हा परिषद मराठी शाळेच्या मुख्याध्यापक सौ कोल्हे मॅडम, चाळीसगांव पंचायत समितीचे सदस्य रवींद्र चौधरी, विस्तार अधिकारी दिगंबर शिर्के, रवीआबा राजपुत यांच्यासह धानवड गावातील नागरिक व विद्यार्थ्यां मोठ्या सख्येने उपस्थित होते.

वृक्षांचे जतन करा वृक्षांच्या वाढदिवस साजरा करू

यावेळी खासदार उन्मेश दादा पाटील यांचा सत्कार युवा मोर्चा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील यांनी केला. हभप ज्ञानेश्र्वर महाराज जळकेकर, ऍड. हर्षल चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. खा. उन्मेश दादा पाटील पुढे म्हणाले की

जैव विविधता नष्ट होत असून निसर्गाचा व पर्यावरणाचा देखील मोठा ऱ्हास होत आहे. निसर्गाचा समतोल देखील बिघडला आहे ही बाब लक्षात घेता त्यावर गावकऱ्यांनी फक्त चिंता व्यक्त न करता लोक चळवळीतून गाव शिवारात जैव विविधता प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेत श्रमदानातून वृक्षारोपण तसेच त्या वृक्षांचे संगोपन जतन करण्याचा संकल्प देखील ग्रामस्थांनी केला आहे. याबद्दल गावकऱ्यांचे अभिनंदन करतो.

पाच एकर जागेवर फुलणारं नंदनवन

शेतकरी विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी श्रमदान करून आठ हजार पेक्षा जास्त वृक्षांची लागवड केली आहे तसेच वृक्षा रोपण केलेल्या पाच एकर परिसरात काटेरी तारेचे कंपाउंड देखील लोकसहभागातून ग्रामस्थांनी केले असून वृक्षांना आवश्यक असलेले गांडूळ खत शेणखत व आवश्यक त्या खतांचा वापर लोकसहभागातून करण्यात येणार आहे.

अनेक दशकांपूर्वी धानवड परिसरात मोठ्या प्रमाणात वन परिसर होता व अनेक औषध उपयोगी वृक्ष या परिसरात पाहायला मिळायचे मात्र कालांतराने मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याने हा परिसर उजाड झाला असून पुन्हा आपले गाव शिवार सुजलाम सुफलाम करण्याचा ग्रामस्थांचा प्रयत्न असून त्यातूनच ग्रामस्थांनी हा जैवविविधता प्रकल्प उभारला असून इतरांनाही उपक्रम प्रेरणादायी ठरणार आहे..

Leave A Reply

Your email address will not be published.