चक्क… भाजप उमेदवाराचाच उमेदवारी अर्जच चोरी…

0

 

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

चोरी म्हटलं कि आपल्यासमोर छोटी-मोठी, पाकीटमारी, चैन, मंगळसूत्र किंवा दरोडा अश्या घटना समोर येतात. मात्र रावेर येथून एक विचित्र चोरीची घात्नासमोर आली आहे. रावेर बाजार समितीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षांचे पती तथा भाजप जिल्हा उपाध्यक्ष यांचा उमेदवारी अर्जच चोरीला गेल्याने याठिकाणी गोंधळ उडाला होता. मात्र हि घटना गंभीर असल्याने, निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांनी गंभीर दखल घेत उमेदवारी अर्ज स्वीकारत असलेल्या ठिकाणाहून गर्दी बाहेर काढून प्रक्रिया सुरळीत पार पाडली.

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रंजना पाटील यांचे पती भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील हे दुपारी दीड वाजेच्या सुमारास बाजार समितीच्या (Market Committee) छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) सभागृहात दाखल झाले, यावेळी त्यांच्या सोबत भाजप जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, पद्माकर महाजन, भाजप तालुकाध्यक्ष राजन लासुकर व पदाधिकारी उपस्थित होते. निवडणूक अधिकारी यांच्या टेबलावर ठेवलेला अर्ज कोणीतरी अचानक कोणीतरी गायब केल्याने, अर्ज शोधण्याची गडबड सुरु झाली. मात्र अर्ज मिळून येत नाही, हे प्रल्हाद पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात येवू लागण्यावर वेळ अर्ज भरण्याची वेळ संपण्याआधी नवीन अर्ज भरून त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. भाजपच्या नेत्यांची अशी परिस्थिती होते, तर सर्वसामान्य उमेदवारांची तर कशी गत होईल हे यावरून दिसून येते. मात्र अर्ज चोरीची घटना राजकीय चर्चा शहरात रंगली आहे.(The incident of application theft has become a political debate in the city)

Leave A Reply

Your email address will not be published.