धरणगावात भिंत फोडून जिनिंगमधून लाखोंची कपाशी व मक्याची चोरी…

0

 

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

अज्ञात चोरट्यांनी शहरातील चोपडा रोडवरील कमल जिनिंगमध्ये धाडसी चोरी करत लाखोंची कपाशी, मका लंपास केला आहे. चक्क भिंत फोडून चोरट्यांनी जिनींगमध्ये प्रवेश केला. यांनतर शेतमाल कारमध्ये टाकून साधारण 35 ते 40 क्विंटल कपाशी आणि तेवढाच मका चोरून नेला. या प्रकरणी रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील चोपडा रोडवर पवन महाले यांची कमल जिनिंग आहे. अज्ञात चोरट्यांनी शनिवार रात्री जिनिंगची बाजूची भिंत फोडत आत प्रवेश केला. त्यानंतर फोडलेल्या भिंतीच्या बोगद्यातून साधारण 35 ते 40 क्विंटल कपाशी आणि तेवढाच मका चोरून नेला. कपाशीला 8 हजार रुपये भाव असल्यामुळे तिची किंमत साधारण चार लाखांच्या घरात आहे. तर मका 50 हजार रुपये असा साधारण साडेचार लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. घटनास्थळी कारच्या टायरचे खुना दिसत आहेत. त्यामुळे चोरट्यांनी मका आणि कपाशी चार चाकीमधूनचे नेल्याचे स्पष्ट आहे.

मजूरांना समजली घटना…

दरम्यान, आज सकाळी नेहमी प्रमाणे मजूर कामावर आल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ पथकासह घटनास्थळी हजर झालेत. कपाशीला चांगला भाव असल्यामुळे चोर शेतातून कापूस चोरून नेत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या प्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.