‘द हायवे मॅन’ नितीन गडकरींच आयुष्य उलगडणार रुपेरी पडद्यावर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आयुष्य जनतेला रुपेरी पडद्यावर बघता येणार आहे. देशातील मोठ्या नामवंत व बड्या राजकारण्यांपैकी एक नेता म्हणून नितीन गडकरी एक वेगळी ओळख आहे. सक्षम आणि कार्यतत्पर नेतृत्त्व, सडेतोड भूमिका, नव्या भारतासाठी दूरदृष्टी ठेवून धडाकेबाज निर्णय घेणारे राजकारणी नेते अशी त्यांची ओळख आपण अनेकदा पाहिली आहे. नितीन गडकरी यांनी देशाच्या विकासात एक मोठा हातभार लावला आहे. परखड मत मांडणारे आणि कोणालाही न घाबरता योग्य तो निर्णय घेणार व्यक्तिमत्व म्हणजे नितीन गडकरी होय. त्यांच्या जीवनातल्या अनेक घडामोडी आता चाहत्यांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वाधिक काळ काम करणाऱ्या नितीन गडकरी यांची ओळख ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ अशीही आहे. देशाच्या विकासासाठी कायमच कटिबद्ध असणाऱ्या नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे टिझर पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.