दिलासादायक : तुमचा EMI वाढणार नाही, रेपो रेट जैसे थे

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेट कायम ठेवले आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाहीय. RBI ने सलग चौथ्यांदा व्याजदर 6.5% वर स्थिर ठेवले आहेत. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज शुक्रवारी चलनविषयक धोरण समितीच्या निर्णयांची माहिती दिली.

4 ऑक्टोबर रोजी चलनविषयक धोरण समितीची बैठक सुरू झाली. आरबीआयने फेब्रुवारी 2023 मध्ये रेपो रेट 6.5% पर्यंत वाढवला होता. त्यानंतर यात कोणताही बदल झालेला नाही. चलनविषयक धोरणाची बैठक दर दोन महिन्यांनी होते. या आर्थिक वर्षाची पहिली बैठक एप्रिलमध्ये झाली. तर गेल्या आर्थिक वर्षात रेपो दरात 6 वेळा 2.50% ने वाढ करण्यात आली होती.

रेपो रेट वाढला तर कर्जाच्या व्याजदरात वाढ होते. पण हा रेट कायम राहिल्याने कर्ज महागणार नाही. त्यामुळे हा सर्व सामान्यांसाठी दिलासा आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.