सप्तश्रृंगी देवीचे मंदिर आता २४ तास खुले राहणार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

काही दिवसात नवरात्रोत्सव सुरु होत असून साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक वणी येथे येतात. सप्तश्रृंगी देवीच्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी आहे.

सप्तशृंगी देवीच मंदिर नवरात्रौत्सव काळात भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. १५ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर दरम्यान मंदिर भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुलं राहणार आहे.नवरात्रौत्सव काळात देवीच्या दर्शनासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

नवरात्रौत्सव काळात नांदुरी ते सप्तशृंगी गडादरम्यान खासगी वाहतूक देखील बंद राहणार आहेत. नवरात्रोत्सवात भाविकांची संख्या लाखोमध्ये असते. त्यामुळे एकाचवेळी अनेक भाविक याठिकाणी जमतात. अशावेळी चेंगराचेंगरी टाळण्यासाठी दर्शनाला जाण्यासाठी आणि परतण्यासाठी २ स्वतंत्र मार्गांच नियोजन करण्यात आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.