ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात, दुचाकीस्वार जागीच ठार

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

यावल तालुक्यातील नायगाव ते किनगाव दरम्यान दुचाकी व ट्रकचा भीषण अपघात झाला असून, झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागेवरच दुदैवी मृत्यू झाला आहे. यावल पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

सूत्रांनुसार, तालुक्यातील नायगाव येथील राहणारे परशुराम प्रभाकर कोळी (वय ३७) हे दुचाकी (एमएच १९, यू- ८६४ ) ने किनगावला जात असतांना नायगाव शिवारात किनगाव रस्त्यावरील शेताजवळ ५ ऑक्टोबर रोजी दुपारी १ ते २ वाजेदरम्यान ट्रक (एमएच- १७, बिडी – ००८०) हा अपघात झाला. झालेल्या अपघातात भुषण परशुराम कोळी यांचा जागीच मृत्यू झाला. मृत भूषण यांचे चुलत भाऊ चंद्रभान सुधाकर कोळी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन ट्रक चालक इम्रान खान रसुल (रा. साकळी, ता. यावल) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी ट्रक व अपघातग्रस्त दुचाकी ताब्यात घेतली असून, यावलच्या ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे यांनी मृत परशुराम कोळी यांचे शवविच्छेदन केले. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार असलम शेख करत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.