धक्क्कादायक; वडिलांचं पार्थिव घेऊन जाताना मुलाच्या गाडीला भीषण अपघात

0

 

बुलढाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

वडिलांचे निधन झाल्याने त्यांचे पार्थिव एका रुग्णवाहिकेद्वारे घेऊन बिहारकडे निघाले होते. पार्थिव असलेल्या रुग्णवाहिकेच्या मागे त्यांची कार होती. त्या कारला मेहकर तालुक्यातील डोनगाव जवळ एका ट्रकने जबर धडक दिली. या धडकेत कारचं मोठं नुकसान झालं. तर कारमधील 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

सविस्तर वृत्त असे की, वडिलांचं पार्थिव मूळ गावी घेऊन जात असताना मुलाच्या गाडीला भीषण अपघात झाला. ही धक्कादायक घटना मेहकर तालुक्यातील डोणगावाजवळ घडली आहे. वडिलांचे पार्थिव रुग्ण वाहिकेद्वारे बिहारमधील मूळगावी अंत्यसंस्कारासाठी घेऊन जाताना हा प्रकार घडला.

मुलाच्या कारला भीषण अपघात झाला. ही कार त्या रुग्णवाहिकेच्या मागे चालत होती या अपघातात 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ उपचारार्थ डोनगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.