संभाजी राजेंच नेतृत्व नको… मराठा क्रांती मोर्चा आक्रमक…

0

 

औरंगाबाद , लोकशाही न्यूज नेटवर्क;

राज्य सरकारने बोलावलेल्या बैठकीत छत्रपती संभाजी राजेंनी समनव्यकांना बोलू न दिल्याने औरंगाबादेतील मराठा क्रांती मोर्चाच्या समनवयकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे संभाजीराजेंनी आता आमचे नेतृत्व करू नये, अशी भूमिकाच मांडली आहे.

‘नेतृत्व करत असताना सर्व समावेशक आणि व्यापक असले पाहिजे. कोपर्डी प्रकरणापासून अन्यायाला वाचा फुटली. त्यानंतर आम्ही सर्व एकत्र आलो, जे पहिल्यापासून सर्वजण एकत्र होते. कालच्या बैठकीला त्यापैकी एकही माणूस नव्हता. नेमकी नेतृत्व करण्याची जबाबदारी कुणी दिली? कुणी सांगितलं हे आमचं नेतृत्व आहे? आमचे कुणीही नेतृत्व नाही, हे आम्हाला मान्य नाही. आमचं नेतृत्व फक्त छत्रपती शिवराय हेच आमचं नेतृत्व आहे’ असं मराठा क्रांती मोर्चा समनव्यकांचं म्हणणं आहे.

तुम्ही तुमच्या बैठका रात्रीच्या अंधारामध्ये घेतात, काय चाललंय काय नेमकं? सर्व व्यापक बैठक का होत नाही, लोकांना बोलावून बैठक घेतात आणि व्यापाक बैठकीचे स्वरूप देतात. मोजकेच लोक गोळा करता. “मराठा क्रांती मोर्चाचं नेतृत्व कुणीही नाहीये. छत्रपती संभाजीनगर शहरातून तो सुरू झाला आहे. आम्ही सगळे त्या मोर्चाचे शिलेदार आहोत. जवळचा एखादा माणूस हाताशी धरून आणि त्या नेतृत्वाला पुढे करून जर आपल्या राजकीय पोळ्या भाजून घ्यायचा प्रयत्न करत असाल, तर लक्षात ठेवा, तुम्हाला पळता भुई थोडी होईल अशी तुमची अवस्था केल्याशिवाय आम्ही राहणार नाही”, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.