Telangana Election Result 2023: तेलंगणात काँग्रेसला स्पष्ट बहुमत ; बीआरएस ला धोबीपछाड ! ; रेवंत रेड्डी काँग्रेसच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा

0

हैद्राबाद ;- तेलंगणा विधानसभा निवडणूक निकालात कॉँग्रेस पक्ष आघाडी घेतली असून स्पष्ट बहुमत मिळविले आहे . तर सत्ताधारी भारत राष्ट्र समितीला मोठा धक्का बबसला असून भाजपला जेमतेम ८ जागा मिळविता आल्या आहेत . याठिकाणी राहुल गांधी यांची जादू चालली असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.

तेलंगणात विधानसभेच्या एकूण ११९ जागा आहेत. पैकी ६६ जागांवर काँग्रेसनं मुसंडी मारली आहे. दुसरीकडे तेलंगणामधील कामारेड्डी मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या काँग्रेस उमेदवार रेवंत रेड्डी यांनी केसीआर यांना पिछाडीवर टाकले आहे. येथे रेवंत रेड्डी यांनी आघाडी घेत केसीआर यांना मोठा धक्का दिला आहे.

तेलंगणाची स्थापना झाल्यापासून तिथे के. चंद्रशेखर राव यांची सत्ता आहे. तेलंगणा राष्ट्र समितीनं आतापर्यंत तेलंगणात सत्ता राखली. त्यानंतर पक्षविस्ताराच्या दृष्टीकोनातून केसीआर यांनी पक्षाचं नाव बदलून भारत राष्ट्र समिती केलं. पण त्यांना त्यांच्याच राज्यात धक्का बसला आहे. भारत राष्ट्र समिती नावानं पहिल्यांदाच निवडणूक लढवत असलेल्या केसीआर यांना मतदारांना झटका दिला आहे. त्यांच्या पक्षाचे केवळ ४० उमेदवार निवडून आले आहेत. आहेत.

राहुल गांधींची भारत जोडो यात्रामुळे तेलंगणात कॉँग्रेस पक्षाला यश मिळाल्याचे म्हंटले जात आहे. मागील निवडणुकीत केसीआर यांच्या पक्षानं राज्यात तब्बल ८८ जागा जिंकल्या. काँग्रेसला केवळ १९ जागा मिळवता आल्या होत्या. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत BRS ला जोरदार झटका बसला आहे. तेलंगणात दोनदा सरकार स्थापन करणाऱ्या बीआरएसने महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात त्यांनी पाय रोवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र तेलंगणातील त्यांची सत्ता हातातून गेली आहे.

दरम्यान, तेलंगणात कॉँग्रेसच्या विजयानंतर रेवंत रेड्डी थेट मुख्यमंत्री बनण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत रेवंत रेड्डी सर्वात पुढे आहेत. रेवंत रेड्डी हे सध्या लोकसभेचे खासदार आहेत. रेवंत रेड्डी यांच्या मेहनतीमुळे काँग्रेस पहिल्यांदाच राज्यात सरकार बनवणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.