इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम INDIA ची घोषणा; दिग्गज खेळाडू बाहेर तर, एक खेळाडूची सरप्राईज एन्ट्री…

0

 

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शुक्रवारी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली. मात्र यामध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशन यांचा इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी १७ सदस्यीय संघात समावेश नाही. पहिले दोन कसोटी सामने अनुक्रमे हैदराबाद आणि विशाखापट्टणम येथे खेळवले जातील. घोट्याच्या दुखापतीमुळे शमी संघाबाहेर आहे, तर किशनने विश्रांती मागितली आहे. दरम्यान, युवा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेलला २५ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या मालिकेसाठी पहिला कॉल-अप मिळाला आहे. रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करेल, तर स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

https://twitter.com/BCCI/status/1745863218738987289?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1745863218738987289%7Ctwgr%5Efcd8cb8bf398e2cd6f8ebface899902bca395d5c%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fndtv.in%2Fcricket%2Fteam-india-squad-for-1st-two-tests-vs-england-dhruv-jurel-gets-maiden-call-up-no-place-for-shami-and-ishan-kishan-hindi-4851612

बीसीसीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, पुरुष निवड समितीने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारताच्या संघाची घोषणा केली. भारत 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे, त्यातील पहिला सामना 25 जानेवारी 2024 पासून हैदराबादमध्ये खेळवला जाईल. या महिन्याच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटीसाठी संघात वेगवान गोलंदाज आवेश खानचाही समावेश करण्यात आला होता त्या आता संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा पहिल्या दोन कसोटीत भाग घेणार नाही.

उर्वरित कसोटी राजकोट, रांची आणि धर्मशाला येथे खेळल्या जातील.

इंग्लंड विरुद्ध पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत(विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव , मोहम्मद.सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (व्हीसी), आवेश खान

Leave A Reply

Your email address will not be published.