पाचोरा ते गाळण रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेतून पडून इसमाचा मृत्यू…

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

पाचोरा ते गाळण रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या प्रवाशी रेल्वेतून पडल्याने एका अनोळखी इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १३ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, कृणाल प्रकाश अहिरे (वय – ३८) रा. प्लाॅट नं. ५६ कंडारी ता. भुसावळ हे पाचोरा येथुन १३ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास चाळीसगाव येथे कामानिमित्त जाण्यासाठी कामायनी एक्स्प्रेसतुन जात असतांना पाचोरा ते गाळण रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे कि. मी. खंबा क्रं ३६८ / १८ नजीक अप रेल्वे लाईनवर कृणाल अहिरे यांचा तोल जावुन ते धावत्या रेल्वेतून बाहेर फेकले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

इसमाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्राचे पोलिस काॅन्स्टेबल मधुसूदन भावसार यांना मिळाली. तात्काळ घटनास्थळी दाखल होत घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान १३ जानेवारी रोजी रात्री मयताची ओळख पटली असुन मयत कृणाल अहिरे हे येथील पत्रकार सुरेश तांबे यांचे जावई होत. मयत कृणाल अहिरे यांच्या पाश्चात्य पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.