टवाळखोरांनी काढली शालेय विद्यार्थिनींची छेड

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील नवीन बसस्थानकातून निघालेली बस थेट तालुका पोलीस ठाण्यात पोहोचली. मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाची तक्रार केल्याने बसचालकाने पोलीस ठाण्यात आणली. पण त्या तरुणाने चालत्या बसमधून उडी घेत पळ काढल्याची घटना गुरुवारी (ता.२) दुपारी घडली.

जळगाव-नांदगाव या बसमध्ये (एम.एच. ८० वाय ५१९३) विद्यार्थी-विद्यार्थिनींसह प्रवाश्यांची गर्दी होती. बस आव्हाने फाट्याच्या पुढे गेल्यावर एका टवाळखोराने इतर साथीदारांच्या मदतीने बसमधील विद्यार्थिनींची छेड काढली. विद्यार्थिनींनी वाहकाकडे तक्रार केल्यानंतर वाहक लोटन पाटील यांनी टवाळखोराला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही तो त्याच्या मित्रांसोबत बसमध्ये गोंधळ घालून विद्यार्थिनींसमोर चित्र-विचित्र हावभाव करून छेडखानी करत करत होता.

त्यानंतर विद्यार्थिनींनी होणार त्रास वाढल्याने वाहक चालक तुकाराम रायसिंग यांना बस तालुका पोलीस ठाण्यात नेण्याची सूचना केली. नांद्रा गाव एक किलोमीटरवर असतांना चालकाने बस गावात न नेता जळगावकडे फिरवली. पोलिसांच्या भीतीने घाबरलेल्या टवाळखोरांनी बस थांबविण्याची विनंती केली. चालकाने बस पोलीस ठाण्याकडे नेली. बस थांबत नाही म्हंटल्यावर तरुणाने पोलिसांना नाव सांगणाऱ्यांना चॉपर दाखवून धमकी दिली. आव्हाणे फाट्याजवळ तरुणाने चालत्या बसचा दरवाजा उघडून उडी मारली. इथून तो पसार झाला. विद्यार्थी, चालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार त्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.