भुसावळ येथून अवैध वाळूचे डंपर पकडले

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगावकडून बसवलकडे येणाऱ्या मालवाहू वाहनांची महसूल पथकाने तपासणी केली असता त्यात अवैध वाळू आढळून आली. वाहनचालक यावेळच्या दिशेने पळून जाणाऱ्या प्रयत्नात असतांना पथकाने पाठलाग करीत वाहन पकडले.

त्यावेळी वाहन चालक अंधाराचा फायदा घेत पसार झाला. वाहन तपासले असता या वाहनातून वाळू वाहतूक होत असल्याचे दिसून आले. वाहनमालक भास्कर कोळी (रा.कांचननगर, जळगाव) असून, वाहन क्रमांक (एमएच १९, बीएम १३५६) असा आहे. वाहन व वाहनातील गौण खनिजाचा पंचनामा केला असून, वाहनांवर दंडात्मक कार्यवाही होण्यासाठी कामे तहसील कार्यालयात जमा केले आहे.

या कारवाईत भुसावळ महसूल विभागाचे मंडळ अधिकारी एफ. एस. खान, प्रफुल्ल कांबळे, प्रवीण पाटील, रजनी तायडे, पवन नवगाळे, मिलिंद तायडे, मंगेश परिसे, नितीन केले, जितेश चौधरी, शरद पवार, जयराज भालेराव हे होते.

Leave A Reply

Your email address will not be published.