बसचे चाक पायावरून गेल्याने प्रवाशाचा पाय निकामी

0

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

घरी जाण्यासाठी नवीन बसस्थानकात आल्यावर बसने धडक देत चाक पायावरून गेल्याने सय्यद हिसामोद्दीन सय्यद मुसा (६५, रा.फत्तेपूर, ता. जामनेर) यांचा पाय निकामी झाला.

९ ऑगस्ट घडलेल्या या अपघाताप्रकरणी बुधवारी (ता.१) रोजी बस चालकाविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भांडी विक्रीचा व्यवसाय करणारे सय्यद हिसामोद्दीन हे जळगाव बसस्थानकात आले होते. फलाटावर ते जामनेर बसची वाट पाहत उभे असताना समोरून बस (एमएच १४ बीटी १९७६) थेट सय्यद यांच्या अंगावर आली. त्यात ते खाली पडले व बसचे चाक उजव्या पायावरून गेले. त्यावेळी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले

इथून भुसावळ येथे खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. नंतर प्रकृती गंभीर असल्याने कुटुंबीयांनी त्यांना तेथून पुन्हा छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले. तब्येतीत सुधारणा न झाल्याने सय्यद यांचा उजवा पाय गुडघ्यापासून कापावा लागला. दोन महिने वैद्यकीय उपचार घेतल्यावर सय्यद यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार बसचालक सय्यद कमरोद्दीन सय्यद शमशोद्दीन (एमएच १४ बीटी १९७६) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.