१९ वर्षीय तरुणीचा नशिराबाद येथे विनयभंग, आरोपीविरोधात गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

१९ वर्षीय तरुणी घराजवळील किराणा दुकानात गेली असता तिला एका ३० वर्षीय व्यक्तीने दुकानाजवळ वाईट वर्तन केले तर, यावेळी त्याने “तू मला खूप आवडते” म्हणलं असता, तरुणीने त्याला धक्का देत “मी तुझे नाव घरी सांगते” असे सांगते असे म्हणाल्यावर त्याने घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. मुलीच्या तक्रारीवरून नशिराबाद पोलिस ठाण्यात एका जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनुसार, जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावात १९ वर्षीय आपल्या परिसरासह राहत असून, दि.२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ जेजेच्या सुमारास तरुणीच्या आईने दुकानातून सामान घेण्यासाठी पाठवले असता. तरुणी दुकानात जात असतांना याच परिसराती एका ३० वर्षीय व्यक्तीने दुकानाजवळ असतांना तरुणीसोबत चुकीचे वर्तन करीत तिला म्हणाला की, “तु मला खूप आवडते यावर तुझे म्हणणे काय ?” तर तरुणीने त्याला धक्का देत मी तुझे माझ्या घरी सांगते असे म्हणाली असता, त्या तरुणाने घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तरुणीने घरी जाऊन थेट नशिराबाद पोलिसात धाव घेत ३० वर्षीय आरोपीविरोधात विनयभंगाचा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.