आधी दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार चोरला; नंतर चोरट्यांनी दारावर टांगली चिठ्ठी असलेली बॅग…

0

 

तामिळनाडू, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली आहे. ही घटना चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. चोरांच्या टोळक्याने तामिळ दिग्दर्शक मणिकंदन यांचे घर फोडले आणि बरेच सामान घेऊन गेले. यामध्ये दिग्दर्शकाला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराचाही समावेश होता. ही घटना उसिलमपट्टी येथील वडिलोपार्जित घरातील असल्याचे सांगितले जात आहे, मात्र या चोरीनंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

चोरट्यांनी दिग्दर्शकाचे दोन राष्ट्रीय पुरस्कार परत केले असून त्यांच्यासोबत एक चिठ्ठीही सोडली आहे. चोरीच्या दोन दिवसांनंतर चोरट्यांनी दिग्दर्शकाच्या घराच्या गेटवर प्लास्टिकची पिशवी टांगली आणि या बॅगेत त्यांची राष्ट्रीय पुरस्कार व एक चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीत लिहिले होते, “सर, आम्हाला माफ करा. तुमची मेहनत तुमची आहे”. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. यासंदर्भात दाखल केलेल्या अहवालात 15 तोळे सोन्याचे दागिने, एक लाखाची रोकड आणि इतर अनेक मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याचे म्हटले आहे.

अशा प्रकारे चोरीचा प्रकार उघडकीस आला

दिग्दर्शक त्याच्या पाळीव कुत्र्यासोबत राहतो आणि चोरीच्या वेळी तो चेन्नईत होता. दिग्दर्शकाचे काही मित्र मणिकंदनच्या घरी त्याच्या पाळीव कुत्र्याला जेवण द्यायला गेले तेव्हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. अधिक माहिती देताना पोलिस उपअधीक्षक, सी. नल्लू यांनी सांगितले की, ‘त्यांचा एक कर्मचारी नरेश रविवारी रात्री सिनेमागृहातून घरी परतला तेव्हा त्याला गेटवर प्लास्टिकची पिशवी लटकलेली दिसली.’

पदक परत करतांना अधिकारी म्हणाले की, मौल्यवान वस्तू अद्याप जप्त करण्यात आलेल्या नाहीत, मात्र पुरस्कार परत करण्यात आल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.