वरणगाव;- हातनूर येथील रहिवासी असलेल्या एका चाळीस वर्षे महिलेचा विषारी औषध प्राशन केल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने वरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की भुसावळ तालुक्यातील हातनुर येथील सरलाबाई गजानन पवार वय 40 यांनी 29 जुलै रोजी सकाळी आठ वाजता सुमारास कुठले तरी विषारी औषध प्राशन केल्याने त्यांना उपचारासाठी भुसावळच्या एका खाजगी दवाखान्यात दाखल कर करण्यात आले होते. मात्र त्यांचा उपचारादरम्यान 31 रोजी मृत्यू झाला. याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास नावेद अली करीत आहे.