समृद्धीवर भीषण अपघात: 17 कामगार ठार

0

मुंबई ;-समृद्धी महामार्गावरील बुलढाणा अपघाताला एक महिना पूर्णही झाला नसल्याने  ठाणे शहरातील शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गाचं काम सुरु असताना एक भीषण दुर्घटना घडली आहे. क्रेन पडल्याने त्याखाली दबून तब्बल १७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अपघाताच्या ठिकाणी बचाव कार्य सुरू असून, सदर घटनेत आणखी काही व्यक्ती जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेत मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तवण्यात आली आहे.या दुर्दैवी अपघाताची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतली असून त्यासंदर्भात त्यांनी ट्वीट केलं आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली आहे. प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री २३:०० ते ००:०० वाजताच्या दरम्यान, सातगाव पुल, सरळ आंबेगाव, शहापूर, ठाणे. या ठिकाणी समृद्धी महामार्गावरील ब्रीजचे काम सुरू असताना महामार्गावरील क्रेन तेथील काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर पडून अपघात झाला आहे. सदर घटनास्थळी स्थानिक कामगार, पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान उपस्थित असून बचाव कार्य युद्धपातळीवरती सुरू आहे. ही घटना रात्री ११ ते १२ च्या दरम्यान घडल्याची माहिती आहे.

मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना  पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतून दोन 2 लाख रुपयांची मदत -पंतप्रधान नरेंद्र मोदी

महाराष्ट्रातील शहापूर इथं झालेली भीषण दुर्घटना अतिशय दु:खद आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांनी श्रध्दांजली अर्पण केली. अपघातातील जखमींना लवकर आराम मिळावा ही प्रार्थना. घटनास्थळी एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासन अपघाताच्या ठिकाणी काम करत आहे.

बाधितांना योग्य ती मदत मिळावी यासाठी सर्व शक्य उपाययोजना केल्या जात असल्याचे पंतप्रधान म्हणाले. दरम्यान, या अपघातात मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना  पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतून दोन 2 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत केली जाणार असल्याची माहिती ट्विटद्वारे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

 

 

 

 

मृतांची नावे

१)अरविंद कुमार उपाध्याय (वय ३३, रा.उत्तरप्रदेश)

 

२. गणेश रॉय (वय ४३, रा. वेस्ट बंगाल)

 

३. ललन राजभर (वय ३८ ह, रा. उत्तरप्रदेश)

 

४. परमेश्वर सहानी (वय २५, रा. उत्तरप्रदेश)

 

५. प्रदीप रॉय (वय ४५, रा. वेस्ट बंगाल)

 

६. राजेश शर्मा (वय ३२, रा. उत्तराखंड)

 

७. संतोष जैन – प्रमुख (वय ३५, रा. तामिळनाडू)

 

८. राधेश्याम यादव (वय ४०, रा. उत्तरप्रदेश)

 

९. आनंद यादव (वय २५, रा. उत्तरप्रदेश)

 

१०. पप्पु कुमार (वय ३०, रा. बिहार)

 

११. कनन (वय ४०, रा. तामिळनाडू)

 

१२. सुब्रन सरकार (वय २३, रा. वेस्ट बंगाल)

 

१३. सुरेंदर पासवान (वय ३५, रा. उत्तर प्रदेश)

१४. बलराम सरकार ( रा.बंगाल)

Leave A Reply

Your email address will not be published.