एल्विशचा सलमानने घेतला क्लास, मात्र सलमानचाच झाला लॉस

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

‘बिग बॉस ओटीटी 2’ (Bigg Boss OTT 2) सध्या जास्तच चर्चेचा विषय ठरत आहे. बरेच सोशल मीडिया स्टार शो मध्ये पाहायला मिळत आहे. त्यात वाईल्ड कार्ड एंट्री घेत घरात आलेला एल्विश यादव (Elvish Yadav) आपल्या इशाऱ्यावर सर्वांना नाचवत आहे. त्याने घरात येताच घराचा ताबा मिळवला आणि चाहत्यांच्या मनात जागा निर्माण केली. तो घरात आला खरा, पण त्याचे नुकसान झाले तर घरातल्या इतर जणांना. सर्व प्रेक्षांचे लक्ष एल्विश वर असून इतर स्पर्धकांच्या तुलनेत त्याला जास्त प्रेम मिळत आहे.

मात्र कधी कधी शोमध्ये त्याच्या बोलण्याने आणि वागण्यामुळे प्रेक्षकांची मन जिंकत असतांना काहीवेळा बोलण्याचे भानही विसरतो. असं त्याचं आणि बेबिकासोबत भांडण झाल्यावर घडलं. त्यानंतर ‘विकेंड का वार’ मध्ये सलमानने त्याचा चांगलाच क्लास घेतला. मागच्या काही क्लिप सलमानने दाखवल्या आणि त्यानंतर एल्विश आणि अभिषेकला चांगलेच खडे बोल सुनावले.

मात्र एल्विशला रागावणं सलमान खानच्या (Salman Khan) चांगलंच अंगलट आलं आहे. ‘विकेंड का वार’ संपल्यानंतर ट्विटरवर सलमान ट्रेडिंग करु लागला. एल्विशच्या चाहत्यांनी त्याला ट्रोल करणे सुरु केले आहे. एवढेच नाही तर सलमानच्या इंस्टाग्रामचे फॉलोवर्स देखील कमी झाले आहे. सलमानच्या इंस्टावर ६६. ८ मिलियन फॉलोवर्स होते. एल्विस सोबत झालेल्या वादानंतर हाच आकडा कमी झाला असून, ६३. ७ मिलियन इतके फॉलोवर्स आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.