भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
मणिपूर घटनेच्या निषेधार्थ एकलव्य संघटनेचे भडगाव तहसिलदार मुकेश हिवाळे व पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, मणिपूर घटनेच्या व एरंडोल खडके येथील घटनेचा निषेध निवेदन देण्यात आले. निवेदनात या दोघे घटनेमधील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. यावेळी एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष रवी सोनवणे, जिल्हा सचिव दादा बहिलम, जिल्हा संपर्कप्रमुख रोहिदास जाधव, तालुकाध्यक्ष दशरथ मोरे, शहराध्यक्ष विनोद मोरे, युवा तालुका अध्यक्ष किरण मोरे, परमेश्वर गांगुर्डे, मुरलीधर मोरे, ज्ञानेश्वर बोरसे, अशोक भाऊ, उमेश गायकवाड, राहुल सोनवणे, पिंटू भाऊ, बाबाजी कलमे, अरुण सोनवणे व कार्यकर्ते उपस्थित होते.