आयुक्तांची खुर्ची वाचली, नामुष्की टळली!

0

कोरम अभावी विशेष महासभा अनिश्चित कालावधीसाठी तहकूब

 

जळगाव;- महानगरपालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्यावर अविश्वास प्रस्ताव मांडण्यासाठी मंगळवारी महापौरांच्या अध्यक्षतेखाली विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र कोरमआभावी महासभा अनिश्चित कालावधीसाठी तहकूब करण्यात आली असून यामुळे आयुक्तांची खुर्ची वाचली आहे. दरम्यान काल अजिंठा विश्रामगृहावर दोन्ही मंत्र्यांच्या उपस्थितीत नगरसेवक आयुक्त यांच्यामध्ये चर्चा होऊन समेट करण्यात आला होता.

 

त्यानुसार आयुक्तांवर अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याचे निश्चित करण्यात आले होते त्या पार्श्वभूमीवर आज मनपाच्या महासभेत केवळ महापौर जयश्री महाजन ,उपमहापौर कुलभूषण पाटील, डॉक्टर आश्विन सोनवणे सुचिता हाडा, चव्हाण महेश चौधरी नगरसचिव सुनील गोराणे आदी उपस्थित होते.

यावेळी आयुक्त विद्या गायकवाड यांनी महापौर जय श्री महाजन यांच्याकडे एक खुलासा सादर करून त्यात म्हटले आहे की मी आयुक्त म्हणून रुजू झाल्यापासून मनपाला आर्थिक शिस्त लावण्यासाठी प्रयत्न केले व विकास कामांसाठी न्याय देण्याचा प्रयत्न केला. विकास कामांमध्ये मी खोडा घालत असल्याचे म्हणणे म्हणजेच एका प्रशासकीय अधिकाऱ्याचे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न करणे आहे असे त्यांनी आपल्या खुलासात म्हटले आहे. महापौर जयश्री महाजन यांनी नगरसेवकांनी केलेल्या आंदोलनाची वरिष्ठांना कल्पना नसल्याने हा सर्व गोंधळ निर्माण झाला होता. मात्र आंदोलन करण्यापेक्षा चर्चेतूनही मार्ग काढता आला असता असा चिमटा महाजन यांनी काढला दरम्यान महापौरांनी उपोषणाला आपला पाठिंबा नसल्याचा खुलासा केला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.