अमळनेरातील अट्टल गुन्हेगार येरवडा तुरुंगात स्थानबद्ध

0

अमळनेर;-   अमळनेर पोलिसांनी शहरात दंगली आणि तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारावर  कारवाई केली. त्याची पुणे येथील येरवडा तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

विशाल दशरथ चौधरी ( वय २७) असे या आरोपीचे नाव आहे. . अमळनेर शहरातील भोईवाडा भागातील विशाल चौधरी हा शहरातील विविध दंगलीत सहभागी होऊन दहशत निर्माण करत होता. तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, जबरी लूट , तलवार घेऊन दहशत निर्माण करणे असे सहा दखलपात्र गुन्हे तर एक अदखलपात्र गुन्हा त्याच्यावर दाखल आहे.

पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी हेकाॕ.किशोर पाटील व सिद्धांत शिसोदे यांच्या सहकार्याने एमपीडीए प्रस्ताव तयार केला. अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांचे मार्गदर्शन घेऊन प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला.
प्रस्तावाला मंजुरी मिळताच पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे, पोलीस दीपक माळी ,रवींद्र पाटील, शरद पाटील यांनी त्याला १ ऑगस्ट रोजी सकाळी अटक केली. पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे , हेकॉ. कैलास शिंदे , घनश्याम पवार , सुनील पाटील यांनी आरोपी विशाल चौधरी याला पुणे येथील येरवडा तुरुंगात स्थानबद्ध करण्यासाठी रवाना झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.