मला जगायचे होते पण.. सुरतमध्ये महिलेची आत्महत्या …!

0

लोकशाही न्युज नेटवर्क

मला जगायचे होते, पण जगणेच जगणे असाह्य झाले, यामुळे जीवन संपवतेय असे एका महिलेने म्हटलंय. तिने हातावर लिहून ठेवलेल्या या सुसाइट नोटमुळे अनेक जण अचंबित झाले असून हि घटना सुरतमध्ये घडली आहे. तिने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलेली आत्महत्येची कारणे थक्क करणारी आहेत. महिलेने खोलीच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली.

सुरतच्या लिंबायत भागात एका महिलेने राहत्या घरी गळफास घेतला. त्या महिलेचा पतीकडून छळ होत होता. मरण्यापूर्वी महिलेने तिच्या हातावर हिंदीत लिहिले होते, ‘मला जगायचे आहे, पण माझा नवरा मला खूप त्रास देत आहे.’ आत्महत्या केलेल्या महिलेचा पती रिक्षाचालक आहे. झारखंडची रहिवासी असलेली ही महिला पती प्रवीण गोस्वामी सोबत सुरतच्या लिंबायत भागात राहत होती. तिचा विवाह 8 वर्षांपूर्वी झाला होता.तिला दोन मुले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.