नाकावाटे देण्यात येणारी कोविड-19 लस लाँच

0

लोकशाही न्युज नेटवर्क
प्रजासत्ताक दिनानिमित्त, देशातील पहिली नाकावाटे देण्यात येणारी कोविड-19 लस लाँच करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी ही लस लॉन्च केली. ही स्वदेशी लस उत्पादक भारत बायोटेकने बनवली आहे.

शनिवारी, कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा इल्ला यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त कंपनी लॉन्च करण्याची घोषणा केली होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारत बायोटेकने घोषणा केली होती की, ते सरकारला प्रति शॉट 325 रुपये आणि खाजगी लसीकरण केंद्रांना प्रति शॉट 800 रुपये दराने लस विकणार आहे.

वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या सहकार्याने भारत बायोटेकने नाकाची लस विकसित केली आहे. भारत बायोटेकने कोवॅक्सिन ही कोरोनाची पहिली स्वदेशी लसही तयार केली होती. भारत बायोटेकने नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीला iNCOVACC असे नाव दिले आहे. यापूर्वी याचे नाव BBV154 असे होते. ही लस नाकातून शरीरात पोहोचवली जाते. ही लस शरीरात प्रवेश करताच कोरोनाचा संसर्ग आणि संक्रमण दोन्ही रोखते.

Leave A Reply

Your email address will not be published.