केएल राहुलला विराट -धोनीने दिले लग्नाचे महागडे गिफ्ट !

0

लोकशाही न्युज नेटवर्क
टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुलने बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीशी लग्न केले आहे. 23 जानेवारीला दोघांचे लग्न झाले. अथिया ही अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आहे. या लग्नसोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांसोबतच क्रिकेटपटूंनी हजेरी लावली होती. पण रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्यासारखे खेळाडू लग्नाला पोहोचू शकले नाहीत. हे सर्वजण न्यूझीलंडविरुद्ध मालिका खेळत होते.

 

विराट कोहलीने लग्नाला हजेरी लावली नसली तरी केएल राहुलला बीएमडब्ल्यू कार गिफ्ट केली आहे. गिफ्ट केलेल्या कारची किंमत 2.17 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. कसोटी संघाचा उपकर्णधार केएल राहुल हा विराट कोहलीच्या अगदी जवळचा मानला जातो.

विराट कोहलीप्रमाणेच माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेही केएल राहुलला गिफ्ट केल्याचे सांगितले जात आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर धोनीने राहुलला कावासाकी निन्जा बाईक भेट दिली आहे. त्याची किंमत 80 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.