पक्षचिन्ह आणि नाव याबाबत ठाकरे गटाची याचिका ; उद्या सुनावणी

0

नवी दिल्ली ,लोकशाही न्यूज नेटवर्क

शिवसेना नाव आणि पक्ष चिन्हासाठी शिवसेनेने आता न्यायालयीन लढ्याला सुरुवात केली आहे. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
आता या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे. शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला मिळाल्यामुळे ठाकरे गटाला यांना मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आजच सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयासमोर याचिका दाखल करण्यात आली आहे. अभिषेक मनु सिंघवी यांनी निवडणूक आयोगाच्या आदेशाबाबत तातडीचा ​​उल्लेख केला आहे.

उद्याच्या यादीत उल्लेख करा, डावे, उजवे, काळे आणि पांढरे प्रत्येकासाठी समान नियम लागू होतील, असं म्हणत सरन्यायाधीशांनी मंगळवारी सुनावणी केली जाणार असल्याचे सांगितले. दरम्यान, शिंदे गटाकडून आता शिवसेनेची कार्यालय ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे.

आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळातील शिवसेनेचं कार्यालय शिंदे गटाच्या आमदारांनी ताब्यात घेतले आहे. तसंच, शिवालयाचा ही शिंदे गट ताबा घेणार आहे. शिवसेना शिंदे गटातील आमदार शिवालयात जाणार आहे. विधिमंडळातील बैठक झाल्यावर ताबा घेणार आहे.

शिवालय हे पक्षाचे शासकीय कार्यालय आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर हे कार्यालय देखील आमचे असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाने केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.