विधानभवनाच्या शिवसेना कार्यालयाचा शिंदे गटाच्या आमदारांनी घेतला ताबा

0

मुंबई ,लोकशाही न्यूज नेटवर्क
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाले . विधानभवनातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा शिंदे गटाने घेतला आहे.त्यानंतर आज शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्यासह काही आमदार विधीमंडळात दाखल झाले आणि शिवसेना कार्यालयाचा ताबा घेतला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. यावेळी फक्त आणि फक्त शिंदे गटाचे आमदार आणि पदाधिकारी उभे होते. ठाकरे गटाचा एकही पदाधिकारी आणि आमदार उपस्थित नव्हता.

याआधी ठाकरे गटाचा या कार्यलयावर ताबा होता. इथे असलेले बोर्ड आणि बॅनर हटवण्यात आले. त्यानंतर भरत गोगावले यांनी आमदारांसह या कार्यालयावर ताबा घेत म्हटलं की, “आता शिवसेना हा आमचा पक्ष आहे. यापुढे इतर कार्यलयं ताब्यात घेण्यासाठी कायदेशीर प्रयत्न करणार आहे.घुसखोरीवर विधानसभा अध्यक्ष काय कारवाई करणार, असा सवाल खासदार अरविंद सावंत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.