जळगावात सुविधायुक्त मल्टिप्लेक्स स्टार सिनेमाचे उद्या होणार दिमाखदार उद्घाटन

0

जळगाव ;- चित्रपट बघण्याचा अनुभव एका नव्या उंचीवर नेणाऱ्या सुविधासंपन्न मल्टिप्लेक्सचा उद्घाटन सोहळा जळगावमध्ये साजरा होत आहे. स्टार सिनेमाचे उद्घाटन रविवार ३ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, व आ. सुरेश भोळे (राजूमामा), यांच्या शुभहस्ते होत आहे. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, ,जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, , माजी आमदार चंद्रकांत सोनवणे,, उद्योजक सुशीलजी बाफना, सिद्धार्थ बाफना हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

३ डिसेंबर संध्याकाळपासून स्टार सिनेमा मध्ये ऍनिमल व सॅमबहादुर या चित्रपटांचा शो सुरु होतील. मूव्ही, मस्ती, मजा असा धमाल अनुभव देणाऱ्या या मल्टिप्लेक्स मध्ये सराउंड साउंड सारख्या आधुनिक सुविधांनी चित्रपट पाहण्याचा पुरेपूर आनंद प्रेक्षकांना घेता येईल. आरामात बसून चित्रपट पहायला रिक्लायनर सीट्स, लाउंजर सोफाजची सोय आहे. आणि या आनंदात भर घालायला विविध चटकदार स्नॅक्स उपलब्ध आहेतच. तेव्हा मित्रमंडळी, कुटुंबियांसह चित्रपटांचा आनंद घेण्यासाठी स्टार सिनेमा अगदी आदर्श आहे.

राईज बेल एन्टरटेनमेन्ट एलएलपी आणि नयनतारा डेव्हलपर्स, जळगाव यांनी संयुक्तरीत्या स्टार सिनेमा या मल्टिप्लेक्सची निर्मिती केली असून, जळगावमध्ये सर्वप्रथम असा सोयीसुविधायुक्त मल्टिप्लेक्स साकारत आहे. या उद्घाटन सोहळ्याला सर्वांना सहर्ष निमंत्रण देण्यात येत आहे. स्टार सिनेमातील चित्रपटांच्या बुकिंग सुरू झाल्या असून बुक माय शो वरून त्या बुक करता येणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.